धाराशिव (प्रतिनिधी)- के.टी पाटील संगणकशास्त्र महाविद्यालय व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. 

यावेळी वर्धापन दिन विषयी आपले मत व्यक्त करताना डॉ. मसलेकर म्हणाले की“बाबासाहेब आंबेडकर यांनी वेरूळ -अजिंठ्यालगतच छ.संभाजीनगर (औरंगाबाद) परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. आंध्र प्रदेश राज्यातील हैदराबाद येथे उस्मानिया युनिव्हर्सिटी संबंधित सर्व सूचीबद्ध मराठवाड्यामध्ये नऊ महाविद्यालये आहेत.

मराठवाडा विभागात जनतेच्या मागणीसाठी विद्यापीठात 27 एप्रिल 1957 रोजी एक विद्यापीठाची समिति नियुक्ती करण्यात आली आणि अशा विद्यापीठाची स्थापना करण्याबाबतच्या शिफारशी प्रदान करण्यासाठी एक समिती प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी नेमण्यात आली. महाराष्ट्राच्या राज्यपालाने 5 मे 1958 रोजी मराठवाडा विद्यापीठ कायदा करारावर स्वाक्षरी केली.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, 23 ऑगस्ट 1958 रोजी मराठवाडा विद्यापीठाचे उद्घाटन छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथे विद्यापीठ अस्थायी मुख्य इमारतीचे परिसरात केले. एस.आर. डोंगरेकरी हे पहिले कुलगुरू झाले. 

यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रा पराग कुलकर्णी, प्रा.शुभम पाटील, प्रा, मुंढे, प्रा सौ गवळी मॅडम , प्रा गरड सर, प्रा कांबळे मॅडम, प्रा सौ. कदम, प्रा. सौ जोशी मॅडम, श्री कुलकर्णी, श्री अजय शिराळ, श्री राजाभाऊ जाधव, श्री सय्यद. तसेच विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top