धाराशिव (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील सर्व तृतीय पंथीय नागरिकांचे मतदार यादीत नाव नोंदविणे,संजय गांधी योजनेचा पात्र तृतीयपंथीयांना लाभ देणे,त्यांना नवीन राशनकार्ड देणे,नवीन आधारकार्ड नोंदणी करणे व त्यांचे बँकेत खाते उघडून बँक पासबुक देणे आदी विविध योजनांचा तृतीयपंथीयांना लाभ देण्यासाठी दिनांक 26 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय उमरगा येथील सभागृहात सकाळी 11 वाजता शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात वरील योजनांचा तृतीय पंथीय नागरिकांना लाभ देण्यासाठी संबधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहणार आहे.उमरगा तालुक्यातील जास्तीत जास्त तृतीय पंथीय नागरिकांनी या शिबिरात उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घ्यावा.असे आवाहन उमरगा उपविभागीय अधिकारी गणेश पवार व तहसीलदार गोविंद येरमे यांनी केले आहे.