परंडा (प्रतिनिधी) - येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पूणे येथे रसायनशास्त्र वी वी  अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तक व पूरक साहित्य निर्मितीच्या अनुषंगाने दि. 5 ऑगस्ट 2023 रोजी पाठ्यपुस्तक मंडळ पुणे येथे कार्यशाळा आयोजित केलेले आहे. त्या कार्यशाळेसाठी त्यांची विषयानुरुप आंतरक्रिया करण्यासाठी सदस्य म्हणुन नुकतीच निवड करण्यात आली आहे.

त्यांच्या या निवडीमुळे श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, अध्यक्ष सुनील शिंदे यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. त्यांच्या या निवडीमुळे महाविद्यालयातील वरिष्ठ विभागाच्या प्राध्यापकांनी स्टाफ सेक्रेटरी डॉ. शहाजी चंदनशिवे यांच्या हस्ते  बुके देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने  स्टाफ सेक्रेटरी प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे, प्रा.डॉ.विद्याधर नलवडे, प्रा. डॉ. प्रकाश सरवदे, प्रा. डॉ. सचिन चव्हाण, प्रा. जगन्नाथ माळी, प्रा. डॉ. संतोष काळे,  ग्रंथपाल डॉ. राहुल देशमुख, वरिष्ठ लिपिक बाबासाहेब शिरसागर आदी उपस्थित होते. सांस्कृतीक विभागाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी सूत्रसंचालन प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले.प्रास्ताविक प्रा. डॉ. महेशकुमार माने यांनी केले तर प्रा. डॉ. सचिन चव्हाण यांनी आभार मानले.


 
Top