परंडा (प्रतिनिधी) - येथील जिल्हा परिषद उर्दु प्रशाला परंडा शाळेला अखेर तात्पुरता शिक्षक मिळाला आहे.
जि.प.उर्दु शाळेला शिक्षक मिळावा म्हणून दिनांक 20/7/2023 रोजी पालका कडून येथील गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. निवेदन दिल्या नंतर समीर पठाण (एस.के. )यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असल्याने अखेर दिनांक 31/07/2023 रोजी गट शिक्षणाधिकारी यांनी जि.प. उर्दु प्रशाला पालकांच्या मागणीला विचार करून तात्पुरती मुस्तफा जिलानी शेख या शिक्षकाची नेमणूक केली आहे. तसेच पुढे हि विद्यार्थी यांची शिक्षका आभावी नुकसान होणार नाही याची ही तोंडी हमी दिली आहे. शिक्षक व तोंडी हमी दिल्याबद्द्ल पालकाकडून गट शिक्षणाधिकारी यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.