धाराशिव (प्रतिनिधी)- क्रेडाई, महिला विंग क्रेडाई, लघू उद्योग भारती व रोटरी क्लब उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने, देशमाने यांच्या वेणू ग्रीनरी, एमआयडीसी, येथील प्लॉट मध्ये 700 आंब्याची झाडे लावण्यात आली. वृक्षारोपणासाठी धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अतूल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष संजय देशमाने, सचिव पंकज बाराते, महिला विंग क्रेडाई प्रमुख सौ. किरण देशमाने, सहप्रमूख सौ. स्मिता शेटे, रोटरी क्लब धाराशिवच्या अध्यक्ष डॉ. अनार रवींद्र साळुंके, सचिव डॉ. मीना श्रीराम जिंतूरकर, विकास बेलुरे, लघू उद्योग भारतीचे अध्यक्ष निशांत होनमोटे, रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे पूर्व प्रांतपाल रवींद्र साळुंके यांची विशेष उपस्थिती होती.