धाराशिव (प्रतिनिधी)-तालुक्यातील ढोकी येथील सौ. स्नेहलता देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या प्रशालेत मंगळवारी (दि.1 ऑगस्ट) साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
प्रशालेचे मुख्याध्यापक एस. जी. कळकुंबे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी डी. एस. कुरुळे यांनी लोकमान्य टिळक व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याविषयी विषयी माहिती दिली. यावेळी नवे पर्व बहुजन युवक ग्रुपने फकिरा, संघर्ष, अग्निपर्व असे ग्रंथ प्रशालेस भेट देऊन वेगळा उपक्रम राबवला.
कार्यक्रमासाला गावातील नवे पर्व बहुजन युवक ग्रुपचे सदस्य सागर लोखंडे, रसाळ, शेंडगे, सहशिक्षक पुंड, कोतवाल, गोळे, गायकवाड यांच्यासह प्रशालेतील शिक्षकेत्तर कर्मचारी कांबळे, श्रीमती घोटकर, तसेच विद्यार्थी उपस्थित होते. आभार कांबळे यांनी मानले.