परंडा (प्रतिनिधी) - परंडा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करणात आली. यावेळी माजी आमदार राहुल मोटे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन श्रीफळ आर्पण करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शहरातील प्रत्येक शाळेतील गरजु दहा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्या, पेन आदीचे  वाटप करण्यात आले. 103 वी जयंती असल्याने एकसे तिन विद्यार्थ्यांना हे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली.शेवटी अध्यक्षीय भाषण माजी आमदार राहुल मोटे यांनी केले. युवकांनी व शालेय विद्यार्थ्यांनी इंटरनेट चा वापर चांगल्या कामासाठी करावा व अण्णाभाऊ दिड दिवस शाळा शिकुन एवढे मोठे साहित्य लिहू शकतात आपण तर किमान बारा वर्षे शिक्षण घेतो मग आपण निट एखादा अर्ज किंवा पत्र व्यवस्थित लिहु शकत नाही. आपण अण्णाभाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घेतले पाहिजे असे म्हटले.                        

यावेळी पोलिस निरिक्षक इज्जपवार, सपोनि कवीता मुसळे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजकुमार जैन, उप सभापती संजय पवार, माजी नगर अध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, ड.संदिप पाटील, प्रा. सुरेश कोकाटे, विकास कुलकर्णी, नाना पवार, हनुमंत गायकवाड, जनार्धन मेहेर, अबा खुळे, हनुमंत गायकवाड, भाऊसाहेब खरसडे, भारत घोगरे पाटील  वंचीत बहुजन अघाडीचे धनंजय सोनटक्के, तानाजी बनसोडे, मोहन बनसोडे, किरण बनसोडे, धनंजय मोरे, धनंजय हांडे, जावेद पठाण, जावेद बागवान, संजय आप्पा काशीद, गणेश राशनकर,बिभिषण खूने, डॉ.अब्बास मुजावर, विश्वास माने, चतूर्भुज जाधव,शरद झोंबाडे, श्रीहरी नाईकवाडी, नंदु शिंदे, नशीर शहाबर्फीवाले, प्रहार जनशाक्ती पक्षाचे तालूका अध्यक्ष नागनाथ नरुटे पाटील, किरण शिंदे, डॉ अब्बास मुजावर, सलीम हांनुरे, कानिफनाथ सरपणे, सत्तार पठाण, प्रदिप डोके, रियाज पठाण, महेश कसबे, मोहन गायकवाड, सचिन जाधव,यांच्या सह विद्यार्थी नागरीक मोठ्या संखेने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाबुराव काळे यांनी तर प्रस्तावीक कार्यकर्माचे संयोजक राहूल बनसोडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीते साठी घनशाम शिंदे,सचिन शिंदे , ऋषीकेश बनसोडे , प्रतिक बनसोडे, रणजित नागटिळक, बाळू माकणीकर, रूपेश बनसोडे, सिध्दार्थ बनसोडे, कृष्णा चौधरी यांनी परिश्रम घेतले.


 
Top