तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिरातील  अभिषेक व सशुल्क दर्शन हॉंल मध्ये  जाण्या साठी असणार्‍या जिन्याच्या पायर्‍या कमकुवत बनल्याने या पायर्‍या दुरुस्ती काम शनिवार दि. 5  ऑगस्ट पासुन आरंभ केले आहे.

सध्या अभिषेक व पेड दर्शन हॉंलमध्ये जाण्यासाठी भाविकांना मातंगी देवी मंदिर  दरवाजा व  साडी केंद्र जवळील प्रवेश व्दारातुन भाविकांना अभिषेक पुजेसाठी हॉंल मध्ये सोडले जात आहे. श्री तुळजाभवानी मंदिरात संभाजी प्रांगणात अभिषेक हॉंल उभारून बरेच वर्ष झाले आहे. सध्या या अभिषेक हॉंल मध्ये जाण्यासाठी असणार्‍या जिना व पायर्‍या कमकुवत बनल्याने व या जिन्याचे व पायर्‍याचे  प्लँस्टर निघु लागल्यामुळे मंदिर समितीने  दुर्घटन घडू नये यासाठी या जिना पायर्‍या दुरुस्ती काम हाती घेवुन आज पासुन या दुरुस्ती काम सुरु केले आहे. तुळजापूर विकास योजनेत दर्शन व.अभिषेक  मंडप समाविष्ट असल्याने हे काम होई पर्यत या हॉंल मधुनच भाविकांना अभिषेक व पेड दर्शनार्थ मंदिरात सोडले जाणार असल्याचे समजते.


 
Top