धाराशिव (प्रतिनिधी)- शहरात 11 वाजून 11 मिनिटांनी कळंबकरांनी एकऋत्र येवून तब्बल 11 हजार 111 झाडांची लागवड केली. पोलिस प्रशासन व कळंबकर यांच्या वतीने संयु्नत वृक्षारोपणचे नियोजन करण्यात आले होते. प्रशासकीय अधिकार्यांनी सामाजिक कार्यात झोकून दिल्यास चळवळ उभी राहू शकते याचा प्रत्यय कळंबकरांनी शनिवारी अनुभवला.
यावेळी व्यासपीठावर आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विभागीय पोलिस अधिकारी एम, रमेश, जिल्हाधिकार्यांच्या पत्नी अस्मिता सचिन ओम्बासे, पोलिस अधिक्षक यांच्या पत्नी महिमा अतुल कुलकणी, धनेश्वरी शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ्र प्रतापसिंह पाटील, पर्याय संस्थेचे विश्वनाथ तोडकर, नॅचरल शुगरचे बी. बी. ठोंबरे, बाजार समिसतीचे सभापती शिवाजी कापसे, संचालक विलास पाटील, मुख्याधिकारी शैला डाके, सामाजिक वनीकरण अधिकारी संतोष दोडके, माजी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख श्रीधर भवर, संजय देवडा, अनंत बलाई उपस्थित होते.
सुत्रसंचालन जगदीश गवळी यांनी केले. कळंब शहरास चळवळीचा इतिहास आहे. कळंबकरांनी एकत्र येवून मांजरा नदीचे खोलीकरण केले होते. आता त्यापोठापाठ पुन्हा एकदा कळंबकरांनी एकत्र येवून नवा इतिहास रचला आहे. एकाच वेळी तब्बल 11 हजार 111 झाडे लावून कळंबकरांनी हिरवाईसाठी संकल्पपूर्ती केली आहे.