धाराशिव (प्रतिनिधी) -भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते ॲड.मिलींदजी पाटील यांची Project & Development India Limited (PDIL) च्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा श्री सिध्दीविनायक परिवाराच्या वतीने सत्कार केला.

यावेळी श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते मिलिंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या प्रास्ताविकामध्ये श्री सिध्दीविनायक परिवारातील पहिली पतसंस्था जनसमृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेची उद्घाटन २२ ऑगस्ट २००२ मध्ये मिलिंद पाटील यांच्याच हस्ते केल्याचे नमूद केले. यावेळी जनसमृद्धी पतसंस्थेला पहिली ठेव पण मिलिंद पाटील यांनी दिली या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी मार्गदर्शनामध्ये मिलिंद पाटील यांनी श्री सिध्दीविनायक परिवाराच्या वाढत्या आलेखा बद्दल संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांना शुभेच्छा दिल्या. आज पर्यंत झालेल्या सत्कारांपैकी हा सर्वात मनाला भावणारा सत्कार असेही यावेळी ते म्हणाले.

यावेळी बालाजी कोरे, ॲड.प्रतिक देवळे, दिनेश कुलकर्णी, गणेश कामटे, राजकुमार जाधव, अरविंद गोरे, देविदास कुलकर्णी, रामचंद्र सारडे व श्री सिध्दीविनायक परिवारातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 
Top