तेर - धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामपंचायत कार्यालयाने गावातील कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टर खरेदी केला असल्याने आता गावातील  कचऱ्याचे योग्य नियोजन होणार आहे.

पंधराव्या वित्त आयोगातुन   तेरकरांच्या सेवेत मिनी ट्रॅक्टर दाखल झाल्याने कचरा व्यवस्थापनची समस्या मिटणार आहे. स्वातंत्र्यदिनी  सरपंच दिदी  काळे,  उपसरपंच श्रीमंत फंड ,माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी,तेर सोसायटीचे उपाध्यक्ष रतन नाईकवाडी, ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 
या वेळी अजित कदम, प्रविण साळुंके,,बापू नाईकवाडी, अविनाश आगाशे, अमोल कसबे ,राम कोळी,नवनाथ पसारे,  धनंजय आंधळे ,नामदेव कांबळे, अभिमान्यु रसाळ, लखन रसाळ , जहांगिर कोरबु, किशोर काळे, संजय लोमटे उपस्थित होते.
 
Top