धाराशिव (प्रतिनिधी) - गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळाचे   पदाधिकारी व सदस्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन अमृत महोत्सव, हर घर तिरंगा, मेरी माटी -मेरा देश ,मातीला नमन- वीराना वंदन ,पंचप्रण प्रतिज्ञा यासाठी मंडळाच्या मानाचा गणपती व धाराशिवचा महाराजा या व्यासपीठावर एकत्र येऊन अमृत महोत्सवाचा जल्लोष अत्यंत धूमधडाक्यात स्वातंत्र्य दिनाच्या या निमित्ताने करण्यात आला. यावेळी श्री गणेश  पूजा विधि व आरती संपन्न झाली. सर्वांच्या हातामध्ये राष्ट्रध्वज व तिरंगा फुगे,त्याचप्रमाणे गणेशाच्या सभोवताली तिरंगा रंगाने आकर्षक विद्युत रोषणाई करून सर्व उपस्थितांचे मन भारावून गेली होती. भारत माता की जय, वंदे मातरम, मेरी माटी- मेरा देश, हर घर तिरंगा, मातीला नमन -वीराना वंदन इत्यादी घोषणाने प्रभाग दणदणून  आनंदी वातावरणामध्ये ,अत्यंत जोश पूर्ण आवाजात ,जयघोष करण्यात आला यावेळी सर्व लहान थोर यांनी पंचप्रण शपथ अत्यंत मोठ्या आवाजामध्ये घेऊन, आपली राष्ट्रध्वज व तिरंगा याबद्दल राष्ट्रनिष्ठा,भक्ती व श्रद्धा अर्पण केली.  या मंडळाच्या वतीने समाजसेवा ,राष्ट्रसेवा व जन सेवा गेली 59 वर्षापासून मंडळ कार्य करीत आहे .मंडळांनी त्रिशताब्दी शिवराज्याभिषेक सोहळा प्रसंगी याचे दृश्य सादर केले होते.

 यावर्षी साडेतीनशे वर्ष शिवराज्याभिषेक सोहळ्यास होत आहेत म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी निधर्मी स्वराज्य निर्मितीची केलेली कामगिरी व महाराजांच्या जीवन चरित्रातील एक प्रसंग यावर्षी देखाव्यातून दाखवून, प्रबोधनातून भक्ती, श्रद्धा, निष्ठा हा संदेश सुराज्य निर्मितीसाठी होईल असे दृश्य सादर करण्यात येत आहे. या स्वातंत्र्य जल्लोषात मंडळाचे पदाधिकाऱ्यांसह  कार्यवाह मनमतआप्पा पाळणे, प्राध्यापक गजानन गवळी  काशिनाथ दिवटे, संजय पाळणे, नंदकुमार हुच्चे, बसवेश्वर पाळणे,  युवराज हुच्चे,केदार उपाध्ये, विश्वास दळवी, मनोज अंजीखाने ,कुणाल दिवटे, ऍड निलेश बारकडे ,रंजीत बुरुंग, साप्ते गोटया, आप्पा खरवरे,विशाल देशमाने  आकाश  महामुनी,  राहूल गवळी शुभम जानगवळी, इत्यादी लहान-मोठे  बहुसंख्येने उपस्थित होते .या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पेढे व बिस्कीट पुढे वाटप करून घरोघर तिरंगा फडकावून आपली एकजूट व राष्ट्राबद्दलचा स्वाभिमान दाखवून दिला.  या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भालचंद्र हुच्चे यांंनी केले व आभार मनमत अप्पा पाळणे यांनी मानले. शोभेच्या दारूच्या आतषबाजीने समारोप करण्यात आला.

 
Top