धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी काही लोक जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख कक्षात कुळ, ईनाम, सिलींग या कार्यसनाच्या संचिका खोट्या व बनावट कागदपत्र तयार करून या बनावट संचिकातील अभिलेख कक्षामार्फत प्रमाणित करून दिल्या जात असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याचा तपास चौकशी समितीने केला असता या प्रकरणात चौघेजण दोषी आढळले. त्यानंतर या चौघांवर आनंदनगर पोलिस ठाणे उस्मानाबाद येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष सिध्दलिंग कुंभार, रा.तेरखेडा, ता. वाशी जि. उस्मानाबाद, विवेकानंद पांडुरंग आकोस्कर, रा. कोळेवाडी ता. जि. उस्मानाबाद, काशीनाथ हनुमंत भोजणे, रा चिखली ता. जि. उस्मानाबाद, काशीनाथ भिवराज खटके, रा. भंडारवाडी ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.31.08.2022 रोजी 10.00 ते 13.06.2023 रोजी 17.00 वा. सु. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख कक्षात कुळ, इनाम, सिलींग या कार्यासनाच्या संचिका खोट्या व बनावट कागदपत्रे तयार करुन या बनावट संचिकातील प्रती अभिलेख कक्षामार्फत प्रमाणित करुन दिल्या जात असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे प्राप्त झाल्या होत्या. वर नमुद आरोपी यांनी शासकीय लाभ घेण्यासाठी बनावट संचिकाच्या नकलाचा वापर केला असल्याचा सशंय असल्याने जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी चौकशी समिती गठीत केली होती. दि.21.08.2023 रोजी चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्याने वरुन नमुद संशयीत आरोपी यांनी खोटे व बनावट दस्तऐवज तयार करुन शासनाची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी चंद्रकांत विठ्ठल शिंदे, वय 57 वर्षे, नायब तहसीलदार रोजागार हमी योजना तथा अतिरीक्त पदभार सामान्य प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद, रा. शाहुनगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांनी दि. 23.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-420, 465, 466, 468, 471 अन्वये गुन्हा नोंदवला