कळंब (प्रतिनिधी) - तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व लोक कल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्यावतीने कळंब तालुक्यात आरोग्य शिबीर चालू असून, या शिबिराला रुग्णाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ईटकुर पासून या शिबिराची सुरुवात झाली असून कळंब येथे समारोप होणार आहे. आता पर्यंत झालेल्या शिबिरात शेकडो अबाल वृद्धांनी तपासणी करून घेतली. या आरोग्य शिबिराचे आयोजन खा. ओमराजे निंबाळकर आ. केलास दादा पाटील शिवसेना तालुका प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती शिवाजी आप्पा कापसे यांच्या मार्ग दर्शना खाली संपन होत आहेत .
लोहटा पूर्व येथे या शिबिराचे उद्घाटन, तालुका प्रमुख शिवाजी आप्पा कापसे, यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी शाम नाना खबाले प्रा. दिलीप पाटील जिल्हा संघटक, तालुका संघटक संजय होळे,जोगदंड बापू, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष मनोहरआबा धोंगडे, प्रा. अरविंद खांडके, सरपंच ऋषी भिसे,अम्रत जाधव,संतोष चव्हाण, फुलचंद कदम, दत्त्तात्रय माळी,व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
तालुक्यातील अबाल वृद्धांनी या शिबिराचा फायदा घ्यावा असे आवाहन, संयोजक , तालुका प्रमुख शिवाजी आप्पा कापसे यांनी केले आहे.