धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागाकडील माहे जुलै 2023 अखेर नियम वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांचा सत्कार समारंभ कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात दि.31 जुलै रोजी सायंकाळी 5.00 वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (प्र.)प्रांजल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अतिरिक्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) सुर्यकांत भुजबळ,  शिक्षणाधिकारी (प्रा) सुधा साळुंके तसेच विविध विभागाचे खाते प्रमुख, सेवानिवृत संघटनांचे पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद कर्मचारी यांच्या  प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये विविध विभागाकडील एकूण 20 सेवानिवृत कर्मचार्‍यांचा सेवानिवृतीनंतर मंजूर सेवानिवृतीविषयक लाभाचे प्रदान आदेश, शाल व विविध वृक्षाचे रोपटे देवून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषदेअंतर्गत दरमहा सेवानिवृत होणार्‍या कर्मचार्‍यांना त्यांचे सेवानिवृती लाभ सेवानिवृती  दिनांकास मंजूर करुन त्यांचा जिल्हा परिषदेच्यावतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता,  मुख्य लेखा व वित्त अधिकारी, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम माहे एप्रिल 2023 पासून दरमहा राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या वेळी  सत्कारमुर्ती तथा सेवानिवृत कर्मचारी यांनी  सेवानिवृतीविषयक लाभ सेवानिवृती दिनांकास मंजूर केल्याबाबत प्रशासनाचे आभार मानले.

 
Top