तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन नववर्षाच्या प्रथम दिनी आवर्जुन घेवुन मगच आपल्या कामास आरंभ करणारे श्री तुळजाभवानीचे निस्मीम देवभक्त प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्याचे घटनने तिर्थक्षेञी तुळजापूरात एकच खळबळ उडुन सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे. नितीन देसाई यांनी श्रीक्षेञ तुळजापूर विकास कामात 108 फुटी भवानी तलवार अलंकार मुर्ती व इतर ठिकाणच्या डिझीईन करुन देण्याबाबतीत योगदान देण्याचा शब्द दिला होता. त्यांच्या निधनाने तिर्थक्षेञ तुळजापूरचे कधीही न भरुन निघणारी हानी झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
कला क्षेञाची कधीही भरुन न निघणारी हानी झाल्याच्या प्रतिक्रिया त्यांच्या सानिध्यात असणार्या येथील कलाकर कलाप्रेमींन मधुन व्यक्त होत आहे. कर्जतमधल्या त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये श्रीतुळजाभवानी देविमुर्ती असुन त्यासमोर देविजीच्या चरणाचे कुंकु ठेवत या मुर्तीचे दर्शन घेऊन कुंकु लावुन मगच ते एन स्टुडीओत जावुन मगच कामास आरंभ करीत असत.
अरबी समुद्रात शिवस्मारक उभारले जाणार असुन त्यात श्री तुळजाभवानी मंदिर व होमकुंड प्रतिकृती करण्याचे काम त्यांच्याकडे व तुळजापूर सिने कलावांत दिलीप भोसले कडे होते ते काम आता अधुरे राहण्याची शक्यता आहे. नववर्षाचा प्रथम दिनी म्हणजे 1 जानेवारी रोजी ते गेली अनेक वर्षापासून तिर्थक्षेञी येवुन श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन पत्नी, एक मुलगा, दोन मुलीसह आवर्जून घेत ही परंपरा त्यांनी अनेक वर्ष आजपर्यत पाळली पण आता त्यात खंड पडणार आहे.
श्री क्षेञ तुळजापूर विकास प्राधिकरण विकास कामांन बाबतीत नितीन देसाई व आ. राणाजगजितसिंह पाटील यांची चर्चा झाली होती यात ते कला रुपी योगदान देण्याचे मान्य केले होते. त्यांच्या निधनाने तिर्थक्षेञ तुळजापूरचे कलारुपी मोठे नुकसान होणार आहे.