धाराशिव (प्रतिनिधी)- महसूल विभागामार्फत राज्यात 1 ऑगस्ट महसूल दिन पासून महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यामध्ये शासन निर्णयामध्ये नमूद सुचनांप्रमाणे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयांमध्ये 1 ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे. 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ, 2 ऑगस्ट रोजी युवा संवाद, 3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा, 4 ऑगस्ट रोजी जनसंवाद, 5 ऑगस्ट रेाजी सैनिक हो तुमच्यासाठी, 6 ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद आणि 7 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताह सांगता समारंभ आदी कार्यक्रम होणार आहेत.
याकरिता जिल्ह्यातील समस्त नागरिकांनी वरील नमूद दिनांकास तहसील कार्यालयांमध्ये उपस्थित राहून आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी केले आहे.