तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालु्नयातील तेर येथील अरफत इरफान मुलानी या अंगणवाडीत शिकणार्या चिमुकल्याचे घरासमोरील लोखंडी गेट अंगावर पडून दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
अरफत इरफान मुलांनी वय.5 वर्ष हा लहान मुलगा बुधवार दि. 2 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरासमोर खेळत होता. खेळ संपवून घरात जाण्यासाठी गेट उघडले असता अंदाजे 300 ते 400 किलो वजनाचे लोखंडी गेट डोक्यावर पडून गंभीर जखमी झाला.डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने तेर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार करून धाराशिव येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला अरफत हा इरफान मुलांनी यांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.