धाराशिव (प्रतिनिधी)-अखिल भारतीय मराठी नाटघ परिषद, मुंबईचा शतकपूर्ती महोत्सव मोठया प्रमाणात महाराष्ट्रभर विविध उपक्रमांने साजरा होणार असून त्या निमित्ताने सदस्य नोंदणीस प्रारंभ झालेला आहे. धाराशिव जिल्हयातून 1000 अजीव सदस्यांची नोंदणी केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हयातील नाटयप्रेमी, लोककलावंत व रसिक यांनी या संधीचा फायदा घेवून लवकरात लवकर आपल्या सदस्यत्वाची नोंदणी करावी असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाटय परिषद, मुंबई शाखा धाराशिवचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी केले आहे.

धाराशिव जिल्हयात मागील 14 वर्षापासून अखिल भारतीय मराठी नाटघ परिषद, मुंबई शाखा धाराशिव कार्यरत असून या परिषदेद्वारे सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन, एकांकीका स्पर्धा, डॉ. बाबासाहेब अंाबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर, उस्मानाबादचा नाटय महोत्सव अशा विविध उपक्रमांचा त्यात समावेश आहे. शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध लोककला महोत्सवात उस्मानाबाद शाखेने सहभाग नोंदवून राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके पटकावली आहेत, त्यातून जिल्हयात सांस्कृतिक चळवळ गतीमान झालेली आहे. ही चळवळ अधिक गतीमान करुन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचे विविध उपक्रम राबविण्यासाठी सदस्य नोंदणी महत्वाची असल्याने ही मोहिम राबविण्यात येत आहे.

सदस्य नोंदणी शुल्क : 1300 रुपये असून सदस्य नोंदणी करण्यासाठी संपर्क अखिल भारतीय मराठी नाटघ परिषद शाखा धाराशिव छत्रपती संभाजीराजे कॉम्पलेक्स शहर पोलीस स्टेशन जवळ, धाराशिव.  संपर्क क्रमांक -  सागर चव्हाण :- मो.नं. 8888419000, सुगत सोनवणे :- मो.नं. 9011219707, ताहेर शेख :- मो.नं. 8308215654.


 
Top