धाराशिव (प्रतिनिधी)- मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रदेश  कार्यालयामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची महेंद्र धुरगुडे यांनी प्रदेश कार्यालय, मुंबई येथे भेट घेतली व पक्ष कार्याचा कार्य अहवाल सादर केला. महेंद्र  धुरगुडे यांना 18 जुलै रोजी उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली होती. निवड झाल्यापासून प्रत्येक दिवसाचा कार्य अहवाल ना. अजित पवार यांच्यासमोर सादर करण्यात आला.

यामध्ये अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या अजित पर्व महाआरोग्य शिबिर, स्त्री रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप, गरजू लोकांना मदत, रक्तदान शिबिर या सर्व कार्याचा उल्लेख केला. महाआरोग्य शिबिरामध्ये मोफत डोळे तपासणी, मोफत चष्मे वाटप, मोफत औषधोपचार, मोफत 1600 चष्मे वाटप व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी  80 रुग्णांची नोंद घेण्यात आली.  याची दखल  ना. अजित पवार यांनी घेतली. महेंद्र धुरगुडे यांच्या कार्याचा पंधरा दिवसाचा अहवाल बघून अजित पवार यांनी इतर उपस्थित सर्व जिल्हाध्यक्ष, नेते, पदाधिकारी यांना आवर्जून सांगितले की पंधरा दिवसापासून धाराशिव जिल्हाभरात अनेक लोकोपयोगी उपक्रम झाले आहेत व या कार्याचा कार्य अहवाल सादर केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष यांच्या कामांचा सर्वांनी आदर्श घ्यावा व यापुढे सर्वांनी असे उपक्रम राबवावे आणि तो अहवाल प्रदेश कार्यालयाकडे सादर करावा. अजितदादांनी महेंद्र धुरगुडे यांचा आवर्जून काका म्हणून असा उल्लेख केला व एक प्रकारे उत्कृष्ट कामासाठी पाठीवर शाबासकीची थाप देऊन कार्याचे तोंड भरून कौतुक केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 
Top