धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील तेर, ढोकी, येडशी, तडवळा या चार गावची पाणीपुरवठा योजना पंधरा दिवसाच्या आत कार्यान्वित करावी अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तेरणा धरणामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात येईल असे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या शिष्टमंडळामार्फत मंगळवारी (दि.1) जिल्हाधिकार्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी रासपाचे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पाटील, जिल्हाध्यक्ष संजय घोडके, अल्पसंख्याक आघाडीचे जावेद शेख, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुहासिनीताई पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार मोटे, जिल्हा कार्यकारणी सदस्य सोमनाथ धायगुडे, धाराशिव तालुकाध्यक्ष सचिन देवकते, परंडा तालुकाध्यक्ष मनोज पाडुळे, भूम तालुकाध्यक्ष गजानन सोलनकर, कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग लोकरे, लोहारा तालुकाध्यक्ष रंगराव देवकर, उमरगा तालुकाध्यक्ष बिराप्पा दुधभाते, धाराशिव तालुका उपाध्यक्ष सतीश डोलारे, परंडा तालुका उपाध्यक्ष नानासाहेब देशमुख, भूम तालुका संपर्क प्रमुख बंडू लोखंडे, कळंब युवक तालुकाध्यक्ष गणेश एडके, विजय वैद्य, रमाकांत लकडे, शेख व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.