तेर ( प्रतिनिधी ) धाराशिव तालुक्यातील तेर येथे पंतप्रधान कार्यालयाच्या मिशन कर्मयोगी अंतर्गत व्यवस्थापक श्रीनिवास अव्देत व अनन्य देव यांनी विविध ठिकाणी पहाणी केली.
केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना ग्रामीण भागात आहेत.त्याची अंमलबजावणी कशी करतात व ग्रामीण भागातील अडचणी काय आहेत या जाणून घेतल्या तसेच ग्रामीण भागात कोण कोणत्या सेवा देता येतात व पंतप्रधान कार्यालयाला सेवा सुधारण्यासाठी अहवाल देणार आहेत.यासाठी पंतप्रधान कार्यालयाच्या मिशन कर्मयोगी अंतर्गत व्यवस्थापक श्रीनिवास अव्देत व अनन्य देव यांनी 23 ऑगष्टला तेर येथील ग्रामपंचायत, चैत्यगृह, अंगणवाडी, जिल्हा परिषद केंद्रीय शाळा, श्री संत गोरोबा काका मंदिर,श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर, एकात्मिक बाल विकास अधिकारी कार्यालय येथे भेटी देऊन माहिती घेऊन पहाणी केली.यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस.ऐ.भांगे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी, वैभव डिगे, बाळासाहेब रसाळ,अशपाक शेख उपस्थित होते.