धाराशिव (प्रतिनिधी)-प्रभाग क्रमांक 9 समता नगर येथील माळी घर ते नागणे घर सिमेंट कॉंक्रिट रस्ता व नाली करणे या कामाचा शुभारंभ नगर परिषदचे गटनेते युवराज नळे यांच्या हस्ते करण्यात आला.  

यावेळी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष सुजित साळुंके, माजी नगरसेवक विशाल साखरे, सचिन शिंदे, माळी काका, राजाभाऊ कारंडे, शिवाजी मोरे, मच्छिंद्र तुंदारे, वासुदेव वेदपाठक, ड. बोंदर, खंडू काटे, पुष्पा ताई शिंदे, मंजुषा साखरे, सराव काकू, कदम काकु, पडवळ काकू तसेच इतर महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रभागातील इतरही रस्त्यांच्या कामासाठी मी व माझ्या सहकारी नगरसेविका सुनिता साळुंके यांनी आमदार राणादादा यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी शासनाकडून 3.75 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. त्याही रस्ते व नाल्यांची कामे अंडरग्राऊंड ड्रेनेजची पाईपलाईनचे काम होताच करण्यात येणार आहेत अशी माहिती युवराज नळे यांनी दिली.


 
Top