धाराशिव (प्रतिनिधी)-एकल महिला संघटना व संस्था संघटनेच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा बार्शिनाका ते अंबेडकर चौक तसेच शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालया मणिपूर येथे आत्याचारीत कुटुंबातील व्यक्तीना न्याय मिळावा यासाठी कठोर शिक्षा करण्यात यावी माननीय आप्पर जिल्हाधिका-यानी निवेदन स्विकारले.
या निवेदनात मणिपूर राज्यातील आदिवासी समाजावरील हिंसाचार थांबून आरोपींना कायदेशीर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन दिले आहे. यावेळी एकल महिला संघटना कांताताई शिंदे तसेच सुधाकर बुकन, बाबासाहेब वडवे, संजीव आगळे, सतिश जाधव, जमिला तांबोळी, रुकशाना शेख, सुजाता जकाते, स्नहलता पोपळे, पुष्पा बनसोडे आदीसह मान्यवर उपस्थित होते.