धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय हे विविध कंपनीच्या प्लेसमेंट मधून सतत विद्यार्थ्यांना रोजगार देण्यामध्ये अग्रेसर आहे. नुकतीच या महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची बायजू या नामांकित कंपनी मध्ये निवड झाली आहे. 

वैभव ठक्कर आणि  निखिल हेलाले या दोन विद्यार्थ्यांची कॉम्पुटर विभागातून निवड झालेली आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत आणि महाविद्यालयाचे सातत्यपूर्ण प्रयत्न या माध्यमातून या विद्यार्थ्यांना कंपनीने  वार्षिक आकर्षक भरघोस असे 8 लाखाचे पॅकेज दिले आहे. 

 चालू वर्षी महाविद्यालयाचे 200  पेक्षा अधिक  विद्यार्थ्यांची टिसिस, कॅपजेमिनी, विप्रो, टेकमहिन्द्र, अटॉस, इन्फोसिस, रेलियन्स फार्म, ओकार्ड, क्नोरर ब्राम्स, बायजू , राधे इंजिनीरिंग सर्विसेस, ओंकार ग्रुप  यासारख्या अनेक नामांकित कंपनीत निवड झाली आहे अशी माहिती प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी दिली. येणार काळ कितीही कठीण असला तरी आम्ही मुलांना रोजगार सक्षम करतो असे मत तेरणा ट्रस्टचे विश्वस्त वाघ यांनी व्यक्त केले.  

तेरणा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. पदमसिंह पाटील, ट्रस्टी आमदार राणाजगजितसिंह पाटील, मल्हारदादा पाटील, आणि महाविद्यलयाचे समन्व्यक प्रा. गणेश भातलवंडे, ट्रैनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. अशोक जगताप  व सर्व कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



 
Top