धाराशिव (प्रतिनिधी)-शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारक उभारण्यासाठी लागणार्‍या जागेचा शासन स्तरावरील परवानगीचे काम अंतिम टप्प्यात असुन या भव्य स्मारकासाठी राज्य सरकार कडुन रू. 1 कोटी उपलब्ध कारून घेणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. 

शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकात आण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, धाराशिव शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी चौकालगत असलेली शासकीय दूध डेअरीची एक एकर जागा घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शहरातील समाजबांधव व नागरिकांसमवेत चर्चा करून, त्यांच्या सूचना विचारात घेऊन आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. याकामी युवकांनी पाठपुरावा करण्याचे त्यांनी आवाहन केले. 

स्मारक उभारण्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून घेयाचे सांगत व व्यक्तिशः मदत करण्याचा शब्द देत समाजबांधवांनी देखील या कामासाठी यथायोग्य योगदान करण्याचे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी याप्रसंगी केले. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, दत्ता पेठे, बापू पवार, संग्राम बनसोडे यांच्या समाजबांधव उपस्थित होते. 


 
Top