तुळजापूर (प्रतिनिधी)-महाराष्ट्र वीरशैव सभा धाराशिव जिल्हाध्यक्षपदी प्रफुल्लकुमार शशिभाल शेटे, महिला जिल्हाध्यक्षा पदी माजी नगरसेविका दीपाताई मस्के व  सचिव पदी सुहास सुरेश तानवडे यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र वीरशैव सभा  या संस्थेच्या शाखा उस्मानाबाद जिल्हा पदाधिकारी, प्रांतिक समिती सदस्य व सभासद यांची मीटींग रविवार दिनांक 16/07/2023 रोजी प्रदेश समिती उपाध्यक्ष एस. एस. मलंग यांचे उपस्थीतीत संपन्न झाली. या बैठकीत खालील जिल्हा समिती पदाधिकारी यांची एकमताने निवड करणेत आली   अध्यक्ष - श्री. प्रफुल्लकुमार शशिभाल शेटे, कार्याध्यक्ष -  शिवशंकर महंतअप्पा माळगे, सचिव- ॲड. सुहास सुरेश तानवडे, सहसचिव- ॲड. प्रदिप निळकंठप्पा पणुरे, कोषाध्यक्ष - सिद्राम विश्वनाथ देशमुख, महिला अध्यक्ष - दिपा नागनाथ मस्के, प्रांतीक सदस्य - प्रकाश बसवणप्पा वाकडे, प्रांतीक सदस्य-श्री. सचिन रेवणसिध्द वाले, सदस्य -  सिद्रामप्पा खराडे, सदस्य - दिगंबर शरणप्पा माळगे, सदस्य  - सुधीर माल्लीकार्जुनप्पा येणेगुरे, सदस्य - चंद्रशेखर सुरेशराव करे नवनियुक्त पदाधिकारी यांचे हार्दीक अभिनंदन करुन भावी कार्यासाठी चंद्रशेखर होनराव

प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र वीरशैव सभा यांनी शुभेछा दिल्या.


 
Top