धाराशिव (प्रतिनिधी)- गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळाने “मानाचा गणपती व धाराशिव चा महाराजा“ या श्री च्या समोर मेजर हॉकी सम्राट ध्यानचंद यांचा प्रतिमेची पूजा करून व श्रीफळ वाढवून सर्व उपस्थितांच्या हस्ते झाले अभिवादन केले. मंडळाचे व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष व धाराशिव जिल्ह्याच्या व्हॉलीबॉल खेळाचे मार्गदर्शक मनमत पाळणे, नंदकुमार हुच्चे, सचिन बुरुंग,
मुझेमिल पठाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. पदाधिकारी व सदस्य व्हॉलीबॉलचे खेळाडू राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार गुणवंत पुरस्कार मिळालेले अंकुश पाटील, राजकुमार दिवटे , रवींद्र जानगवळी, गिरजप्पा दहीहंडे व बंधू ,काशिनाथ दिवटे प्राध्यापक गजानन गवळी अनेक विविध गटामधून राष्ट्रीय पातळी पर्यंत व्हॉलीबॉल खेळाच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासामध्ये सर्वात जास्त खेळाडू या मंडळामध्ये व संघामध्ये आज तागायत विविध क्षेत्रातील विभागांमध्ये कार्यरत आहेत.
या सर्व शिवछत्रपती पुरस्कार चे गुणवंत कामगार या पुरस्कारांच्या प्रेरणे विविध खेळांमध्ये अग्रेसर राहील मेजर ध्यानचंद यांच्या खेळाचा कार्याचा इतिहास हॉकी या खेळामध्ये हॉकीचा जादूगार असे गौरवौदगार काढले जाते .जगात क्रीडांगणावर क्रीडापटू वारंवार काढत असतो. क्रीडा क्षेत्रांमध्ये भारत आणि हॉकी असे समीकरण आजही तागायत आहे .असे मनमत आप्पा पाळणे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विचार व्यक्त केले. मोबाईल मुळे क्रीडांगण ओस पडू लागली आहेत .याची जाण सर्व क्षेत्रातील ज्येष्ठ नामवंत क्रीडापटुनी घ्यायला हवी व हेल्थ इज वेल्थ यासाठी क्रीडा मार्गदर्शकआणि सेवावृत्तीने संघटकाने मैदान व मैदानावर गाजणाऱ्या खेळाडूंचा आदर्श ठरावा असे म्हटले..व्हॉलीबॉल खेळ व इतर खेळास हे उस्मानाबाद जिल्ह्यातील हवामान अत्यंत अनुकूल आहे. स्वर्गीय शिवाजीराव नलावडे भुजंगराव नलावडे ,शिवहरराव पाळणे इत्यादी शिवछत्रपती पुरस्कतेॅ यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ, क्लब इत्यादींची आजही वाटचाल चालू आहे . हा कार्यक्रम प्रा. भालचंद्र हुच्चे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मेजर ध्यानचंद भारताच्या इतिहासामध्ये मैदान व क्रीडांगण क्रीडा स्पर्धा यावेळी स्मरण करून देणारा आहे. यावेळी व्हॉलीबॉल चे खेळाडू, लेझीम खेळाडू इ. बहुसंख्येने या क्रीडादिनी या मंडळाच्या रंगमंचकावर हजर होऊन मेजर ध्यानचंद यांना सर्वांनी अभिवादन केले. क्रीडा दिन सूत्रसंचालन नंदकुमार हुच्चे व आभार या कार्यक्रमाचा समारोप क्रीडा दिन लेझीमच्या खेळाने साजरा केला.