तेर (प्रतिनिधी)- ग्रामीण उद्योजकता व जागृती विकास योजनेअंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय धाराशिव येथील कृषी दूत मंथन भातभागे, ऋषिकेश अहिरे,अभिषेक भांबळे, ऋत्विक  मनसुले, अजय सोलंकर, विवेक सावंत, श्रीनिवास तुंदारे ,विशाल पठाडे, विशाल आखाडे यांच्यामार्फत धाराशिव तालुक्यातील तेर येथे लसीकरणाची मोहीम राबवण्यात आली.                                              

या उपक्रमासाठी तेर येथील शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एम. कुंभार यांचे सहकार्य लाभले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी आणि कृषी दूत यांनी थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन 190 जनावरांचे लसीकरण केले तसेच या आजाराबाबत जनजागृती केली. यावेळी गावातील   पशुपालकानी चांगला प्रतिसाद दाखवला .या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य के आर कांबळे, विषय तज्ञ कार्यक्रम अधिकारी डॉ. के आर चव्हाण  व कार्यक्रमाचे प्रभारी डॉ. के एस थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.


 
Top