तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर धाराशिव शहरातुन जाणार्या महामार्ग रस्त्यावर मोठ्या संखेने मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने नळदुर्ग रोड धाराशिव रोड महामार्गा रस्ता धोकादायक बनला आहे.
सदरील रस्तावर महामार्गवाल्यांनी सुरक्षित ठेवणे गरजेचे असताना दुर्लक्षित पणा करीत असल्याने हा दुर्लक्षित पणा मोकाट जनावरे व यावरुन वाहनातुन जाणार्या प्रवाशांचा जीवावर बेतणारा आहे.
सोलापूर ते धुळे या महामार्गा रस्त्ता तिर्थक्षेञ तुळजापूर येथुन जातो तुळजापूर शहरातुन जाणार्या महामार्ग रस्त्यावर जुने बसस्थानक ते लमाणतांडा पर्यतच्या रस्त्यावर जवळपास वीस गाय बैल वळू जनावरे रस्ता फिरतात मध्ये बसतात. यामुळे महामार्गा रस्ता असल्याने वेगात असणार्या वाहनांन समोर अचानक मोकाट जनावरे येत असल्याने सदरील महामार्गा रस्ता हा जिवीत हानी होणारा ठरत आहे नुकतीच एक घटना घडली. चारचाकी वाहन धारक या महामार्गा रस्त्यावरून मार्ग क्रमण करीत असताना महामार्गा रस्त्यावर उभे असलेली गाय दुसर्या बाजुने ट्रक आल्याने ती गाय इकडल्या रस्त्यावर थेट वाहनासमोर आली. वेगात असलेल्या चारचाकी वाल्याने गाय वाचविण्यासाठी अचानक ब्रेक दाबल्याने वाहन थांबले. माञ वाहनातील प्रवाशी थडकुन जखमी झाले. असे किरकोळ अपघात रोज घडत आहेत. तसेच सोमवार दि. 31 जुलै रोजी नळदुर्ग रोड पंचायत समिती समोर दुभाजक वर बसलेल्या दोन मोकाट जनावरांमध्ये अचानक टक्कर लागली. यात एक मोकाट जनावरे रस्त्यावरून जाणा-या दुचाकीला धडकला यात दुचाकिस्वार रस्ता मधौमध पडला मागुन येणारे वाहन अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकीस्वाराचे प्राण वाचले अन्यथा वाहन त्याचा अंगावरुन गेले असते. तरी रस्ता टोल वसुल करणार्या कंपनीने शहरातुन जाणारे महामार्गावर जनावरे येवु नयेत यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.