तुळजापूर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त युवा नेते अमोल कुतवळ यांनी नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 मधील शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडा साहित्य दिले. यावेळी विकास बापू चव्हाण, संतोष पप्पू पवार, अविनाश मुद्गुले, जफर शेख, सचिन जाधव, औदुंबर कंरडे, पप्पू कांबळे, युवराज पवार, दुर्गादास पवार, शिवा डाके उपस्थित होते.