धाराशिव (प्रतिनिधी)-मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये हिप्परगा (रवा) येथील शाळेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा, धाराशिव तालुक्यातील चिलवडी येथे स्मारक उभा करणे व जिल्ह्यातील 12 हुतात्मा स्मारके दुरुस्तीसाठी दहा कोटी रुपये निधी देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निजामाची जुलमी राजवट संपविण्यासाठी मराठवाड्यातील अनेक स्वातंत्र्यविरांनी बलीदान दिले. जुलमी राजवटीच्या विरोधात लढताना हुतात्मे झाले त्यांची आठवण म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी जिल्ह्यातील 12 ठिकाणी हुतात्मा स्मारके उभी केली आहेत. या स्मारकाची दैयनिय अवस्था असून याठिकाणी ना कंपाउंड, ना पाण्याची व्यवस्था, ना लाईटची व्यवस्था कोणत्याही सुविधा नाहीत. त्यासाठी निधी उपलब्ध नाही,
धाराशिव तालुक्यातील चिलवडी येथे हुतात्मा स्मारक बांधण्यासाठी जागा उपलब्ध झाली नाही. त्याचप्रमाणे मराठवाड्याच्या मुक्तीसंग्राम या लढ्याचे मुख्यकेंद्र असणारी हिप्परगा (रवा) येथील शाळेला स्मारकासाठी जागा उपलब्ध झालेली नाही. राष्ट्रीय दर्जा मिळालेला नाही. ज्या स्मारकामधून स्वामी रामानंद तीर्थ यांनी हे आंदोलन चालवले तेथील हुतात्मा स्मारकाला एक एकर जागा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. अशी मागणी केली आहे.