नळदुर्ग (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने नळदुर्ग येथील बसस्थानकासमोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी विविध मागण्याचे निवेदन देऊन हे आंदोलन थांबविण्यात आले.
येथील राष्ट्रीय महामार्गावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी नळदुर्ग ते आक्कलकोट या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे, नळदुर्ग येथील भीम नगर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाचे प्रलंबित असलेले काम तत्काळ चालू करून गटारीचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करून घ्यावे, त्याच बरोबर राष्ट्रीय महामार्गावर संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा, रमाई व प्रधान मंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल मिळण्यासाठी अतिक्रमण धारकांना कायम करणे, आणि येडोळा ते कंदुर मळा जोडणार्या रस्त्यावर बोरी नदीवर असणार्या पुलाचे काम करण्यात यावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान हे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या नावाने करण्यात आले असून मंडळ अधिकारी गायकवाड यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे प्रदेश सचिव राजा ओव्हाळ, जिल्हा समन्वयक तानाजी कदम, नळदुर्ग शहर अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, अरुण लोखंडे, एस. के. गायकवाड, पंडित भोसले, दत्ता सुरवसे, सूर्यकांत सुरवसे आदीसह बहुसंख्य नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.