धाराशिव (प्रतिनिधी)- सन 2023-24 पासून सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असुन या योजनेमध्ये शेतकर्‍यांनी प्रती अर्ज केवळ 1/- रुपया भरुन पिक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे.

खरीप हंगाम 2023 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत नोंदणी करण्यासाठी राष्ट्रीय विमा संकेतस्थळावर कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकर्‍यांना पिक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत दिनांक 31 जुलै 2023 ही होती. आता शासनाने योजनेस मुदत वाढ दिलेली असुन ज्या शेतकर्‍यांनी अद्याप पर्यंत पिक विमा भरलेला नाही. अशा शेतकर्‍यांना आता दिनांक 3 ऑगस्ट 2023 पर्यंत पिक विमा भरता येणार आहे. जवळच्या बँकेतून किंवा आपले सरकार सेवा केंद्रातून पिक विम्याचे अर्ज भरुन घ्यावेत. ज्या पिकाचा विमा उतरावयाचा आहे.पिक शेतात पेरल्या बद्दलचे स्वयंघोषणापत्र, सात बारा, 8 अ, उतारा, आधार कार्ड व बँक पासबुक च्या झेरॉक्स प्रतिसह नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर मार्फत, बँकेमधून किंवा शेतकर्‍याकडे स्वत: ची सोय असल्यास पिक विमा पोर्टलवरुन पिक विमा हप्ता भरुन पिक संरक्षित करावे ,असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.


 
Top