धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील सावरगाव (काटी) येथे नागपंचमी यात्रा व साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.

सावरगाव (काटी) ता. तुळजापूर जि.धाराशिव येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 570 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी 90 रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या शिबीरात प्रमुख पाहुणे तालुका अध्यक्ष व उपाध्यक्ष कृषी उत्पंन्न बाजार  समिती तुळजापूर संतोष दादा बोबडे, माजी. जि.प सदस्य राजकुमार पाटील, मा. सरपंच रामेश्वर आबा तोडकरी, आनंद बोबडे, मा. उपसभापती विलास डोलारे, रणजित सांबळे, केशव डोलारे, सुभाष कसबे, राहुल डोलारे, गोरख डोलारे, नागेश पवार, खंडू डोलारे, आदित्य डोलारे, नितीन साबळे, तुकाराम डोलारे, भारत डोलारे, सुहास डोलारे, रघुनाथ डोलारे, पाडुरंग हाजारे, शाहु माळी, मनोज फंड, मल्लेश डोलारे, रोहित पाटील, नितीन डोलारे, लखन डोलारे इत्यादी उपस्थित होते तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. ओम खानापूर, डॉ. मयुर पाटील, डॉ.आक्षय कांबळे, डॉ. धनवी मोरे डॉ. मुक्ता थीटे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे, योगेश मारडकर, प्रा. आरोग्य केंद्र सावरगाव च्या आशा कार्यकर्त्या महानंद भालेकर, रत्नप्रभा गाटे, आनिता जाधव, निता तानवडे, जयश्री भडंगे, महानंदा तोडकरी यांनी परिश्रम घेतले.


 
Top