धाराशिव (प्रतिनिधी) - तांत्रिक वीज कर्मचारी व इतर कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. उस्मानाबाद या संस्थेची 10 एकर जमीनीची (मालमत्ता) अध्यक्षांनी परस्पर विक्री केली आहे. त्यामुळे संस्थाचालकावर पुन्हा दाखल करण्याची मागणी सभासदांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.21 ऑगस्ट रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, तांत्रिक वीज कर्मचारी व इतर कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. उस्मानाबाद या संस्थेची स्थापना 1995-96 साली करण्यात आली आहे. या संस्थेमध्ये 186 सभासद असून ही संस्था डीडीआर कार्यालयात नोंदणी केली आहे. या संस्थेचे अध्यक्ष यांनी सर्वे नं. 388 मधील 10 एकर क्षेत्राचा सातबारा हा तांत्रिक वीज कर्मचारी व इतर कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित उस्मानाबाद व संस्थेचे अध्यक्ष यांच्या नावे आहे. ही जमीन दि.3 जून 2022 रोजी आयेशा इम्रान शेख यांना 0.80 आर तर जाकिया बेगम काशीम शेख यांना 1 हेक्टर 20 आर तसेच शेख इम्रान अहमद शेख हुसेन यांना 1 हेक्टर व शेख हुसेन यांना 1 हेक्टर 02 आर या 4 व्यक्तींना संस्थेच्या व सभासदांच्या मालकीची जमीन एकाही सभासदाच्या परवानगीशिवाय. विशेष म्हणजे सर्वांना अंधारात ठेवून परस्पर विक्री करून दस्त केलेला आहे. 

संबंधित अधिकाऱ्यांना 40 ते 50 लाख रुपये लाच देऊन हा व्यवहार पूर्ण केला आहे. या जमिनीवर सध्या विकास काम चालू झाले असून ते तात्काळ बंद करून कायदेशीर कारवाई करावी व गुन्हा दाखल करून सर्व सभासदांना त्यांची मालमत्ता परत मिळवून देण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावेळी प्रा भालचंद्र हुच्चे, महेंद्र बिदरकर, शेषराव खडके, मुरली रंगदळ, दिलीप सराव, नवनाथ सराव, गणेश सराव, संतोषकुमार मोदाणी, सुनिल गोसावी, रामभाऊ शेरकर, जितेंद्र कापसे, अल्लाउद्दीन शेख, मारुती राऊत, गणपती पाटील, बाळासाहेब साठे, एकनाथ मगर, आत्मलिंग उंबरे, बाबासाहेब तीर्थकर, चणबस फुटाणे, दिलीप कांबळे, लहू खडके, शशिकांत सदावर्ते आदींसह इतर सभासदांच्या सह्या आहेत.


 
Top