धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यात प्रशासनाने भर घातली का काय असा प्रश्न उपस्थित होत आहे जिल्ह्यामध्ये सर्वच मंडळात एकेवीस दिवसापेक्षा जास्त दिवस झाले पाऊस झालेले नाही. त्यात प्रशासनाने काही भागात पाऊस झाल्याची नोंद दाखवून तो भाग 25% अग्रीम विमातून वगळल्याचे शेतकऱ्याचे मत आहे. वळलेली मंडळ 25% अग्रीम विम्यात सामील करावी यासाठी मौजे गोविंदपुर तालुका कळंब येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
मौजे गोविंदपूर महसूल मंडळात गेल्या 25 ते 26 दिवसापासून पूर्णपणे पावसाला खंड पडलेला असुन या मंडळातला खंड पडलेला असताना या मंडळात 14 ऑगस्टला पाऊस पडला असे चुकीची माहिती देण्यात आली त्यामुळे कळंब तालुक्यातील मौजे गोविंदपूर हे महसूल मंडळ वगळण्यात आले आहे, तरी मे साहेबांनी प्रत्यक्ष परिस्थिती पाहुन तात्काळ पंचनामे करावे च्या निकषानुसार पंचनामे करुन मद्दत देण्यात यावी व महसुल मंडळातील वास्तव परस्थिती आत्यंत वाईट आहे, त्यामुळे शेतकी आर्थिक संकटामध्ये सापडलेला असुन गतवर्षीचे सततधार व अतिवृष्टीचे मुख्यमंत्र्याने जाहिर केलेले अनुदान आद्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नाही व त्यातच मौजे गोविंदपूर मंडळ हे 25% ॲग्रीम पीकविम्यातून वगळलेले आहे. अश्या परस्थितीमुळे या मंडळातील शेतक-यांची अत्महत्या हाण्याचे नाकारता येत नाही. असे शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ग्रामपंचायत कार्यालय वडगाव ( शि ) व शेतकऱ्यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनावर रामजीवन बोंदर, सचिन पवार, बालाजी बोंदर,उमेश ढेकने, शिवाजी बंडगर, रमाकांत पवार, सुभाष देशमुख यांच्यासह मंडळातील शेतकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.