तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे तुळजापूर विकास आराखडा अंतर्गत घाटशिळ पार्किंग येथे तयार करण्यात येणारा दर्शन मंडप हा भाविकांची पायपीठ करणारा व गैरसौयीचा असल्याने तो विजय वाचनालय परिसरात उभारण्याची मागणी शहरवासियांनी जिल्हाधिकारी यांना गुरुवार
दि. 24 ऑगस्ट रोजी तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन देवुन केली.
सध्या घाटशीळ वाहन तळ येथे नियोजीत दर्शन मंडप उभारणार असल्याची चर्चा आहे त्या ऐवजी
श्रीतुळजाभवानी मंदिरानजीक असणारे विजय वाचनालय व नगर परीषदेची जुनी भाजीमंडईही ठिकाणे प्रशासनाने ताब्यात घेवून येथे दर्शन मंडप उभारुन तेथुन सामल धर्मशाळेच्या मार्गे सध्या अस्तीत्वात असणाऱ्या दर्शन मंडपास व संभाव्य होणाऱ्या राजे संभाजी प्रांगण व राजे राजाराम प्रांगण येथील अभिषेक मंडपास जोडल्यास आणि भाविक भक्तांची योग्य सोय होईल व त्यांना मंदिरात मुख्य महाव्दारापासून जाण्यासाठी सोईस्कर होईल, हाडको मैदान येथे विश्रांती स्थान व वाहनतळ करणे व तेथुन नव्याने उभारण्यात येणाऱ्या घाटशिळ वाहन तळ येथील दर्शन मंडपात भाविकांना येण्यासाठी जवळपास दीड किलो मिटर अंतर चालावे लागणार आहे. कारण प्रत्येक भाविकांना ऑटो
ने येथे येणे हे परवडणारे नाही त्यात अपंग, वयोवृद्ध भाविकांची गैरसोय होणार आहे. श्री तुळजाभवानी दर्शनार्थ पोर्णिमा मंगळवार शुक्रवार येणारा भाविक मंदिर महाद्वार समोरुन कळस शिखर दर्शन घेऊन जातात. धार्मिक वृत्तीचे देवीभक्त गोमुख कल्लोळ हे तीर्थ कुंडात डोक्यावर पाणी शिंपडुन वहातपाय धुवुन हिंदू संस्कृति नुसार मंदीरात प्रथम गणपती हो कुंड , कासव दर्शन घेवुन देविदर्शनार्थ जातात . यानव्या दर्शन मंडपमुळे पुर्वपार चालत आलेल्या सर्व रूढी परंपरांना बगल देणे योग्य होणार नाही घाटशीळ वाहनतळात दर्शन मंडप उभारणी खर्च प्रचंड होणार आहे सुरक्षेच्या दृष्टीने स्कायवॉक धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. तरी या विकास आराखडा मध्ये बदल करण्यात यावा असे निवेदनात म्हटल आहे. .याची प्रतीमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. पालकमंत्री खासदार आमदार यांना दिल्या आहेत या निवेदनावर विजय भोसले शुभम क्षिरसागर
शशी नवले.सागर गंगणेसह शहरातील हजारो नागरिक व्यापारी पुजारी वृंद यांच्या स्वाक्षरी आहेत