धाराशिव ( प्रतिनिधी) - जिल्ह्यातील महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक तातडीने करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय लोकशाही दिन 21 ऑगस्ट रोजी आयोजित केला आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे व महिलांचे तक्रारीची शासकीय यंत्रणेकडून तात्काळ सोडवणूक होण्यासाठी महिला लोकशाही दिन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो.

या महिला लोकशाही दिनामध्ये तक्रार सादर करताना ती वैयक्तीक स्वरूपाची असावी.न्यायप्रविष्ठ प्रकरणे,सेवा विषयक,आस्थापना विषयक प्रकरणे व अपुर्ण, अर्धवट माहिती असलेले अर्ज सादर करता येणार नाहीत.

हा महिला लोकशाही दिन 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयेाजित करण्यात आला आहे.

तरी गरजू महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.व्ही. अंकुश यांनी केले आहे.

 
Top