धाराशिव ( प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) जिल्हा कार्यालय धाराशिव येथे  (दि.15 )भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा दिन मोठ्या उत्साहात  उत्साहात साजरा करण्यात आला. 

76 वा स्वातंत्र्य दिन जिल्हा कार्यालयात साजरा करताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारत माता की जय चा जयघोष  व देशभक्तीपर नारे  देण्यात आले.स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त करताना "भारत देशाचा हा स्वातंत्र्य दिन अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून आणि शूर सत्याग्रहींच्या त्यागातून साकारला. त्या सर्वांचे कृतज्ञ स्मरण करूयात असे ते म्हणाले.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते .सुरेश बिराजदार आणि जिल्हाध्यक्ष  महेंद्र काका धुरगुडे यांनी  भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
        यावेळी उपस्थित राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे, असद खान पठाण, खलील पठाण, नागनाथ आप्पा जगताप, सतीश घोडेराव,सचिन तावडे,मच्छिंद्र क्षीरसागर, बालाजी शिंदे, अतुल जगताप, विवेक साळवे, राजकुमार पवार, राजाभाऊ जानराव, अप्सरा पठाण, महेश साळुंखे,महेश नलावडे, डी. के.कांबळे, भाई फुलचंद गायकवाड, आदी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
 
Top