धाराशिव ( प्रतिनिधी) -लहुजी नगर, मंगरुळ ता.तुळजापूर जि.धाराशिव येथे दि.१५ऑगस्ट २०२३ रोजी साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.
मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी मंगरुळ ता. तुळजापूर जि.धाराशिव येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ४७० रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी ६० रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या शिबीरात प्रमुख पाहुणे मा. उपसभापती चित्तरंजन आण्णा सरडे, उपसरपंच गीरीश सर डोंगरे, ग्रा.प.सदस्य गोंविद डोंगरे, आदम फकीर, आप्पासाहेब जेठीथोर, अण्णासाहेब लबडे, शोभा राजकुमार पारधे, परमेशवर सगर, सयाजी शिंदे, मल्हारी कांबळे, नागनाथ काबंळे व संयोजक अण्णा भाऊ साठे जयंती समीतीचे अध्यक्ष सोमनाथ काबंळे इत्यादी उपस्थित होते तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. गोपाल कृष्ण हाडे, डॉ. विविक गुपता, डॉ.स्नेहल केंद्रे, डॉ. मयुरी झंवर डॉ. अतुल जामदरे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, योगेश मारडकर, प्रा. आरोग्य केंद्र मंगरुळ चे सारंग देशमुख व आशा कार्यकर्त्या यांनी परिश्रम घेतले.