धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यात ज्या महसूल मंडळामध्ये सलग 21 दिवसापेक्षा जास्त दिवस पावसात खंड पडला आहे असे महसूल मंडळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या तरतुदीनुसार 25 टक्के अग्रीम मिळण्यास पात्र असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिली.

जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पावसात खंड पडलेला आहे. अशा 31 अधिसुचित महसूल मंडळात प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या तरतुदीनुसार पावसातील खंडामुळे शेतकऱ्यांच्या चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनामध्ये गत 7 वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत 50 टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर ती महसूल मंडळ पात्र राहतील व उंबरठा उत्पन्नाच्या आधारे येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या 25 टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. या बाबीअंतर्गत शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम मिळण्याबाबत पुढील कार्यवाही करण्याकरीता जिल्हास्तरीय समितीने आदेश दिले आहेत. 

जिल्ह्यात खरीप हंगाम 2023 अंतर्गत सरासरी क्षेत्र 5 लाख 4 हजार 736 हेक्टर आहे. प्रत्यक्षात 5 लाख 59 हजार 157 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन पिकाची 4 लाख 78 हजार 474 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.जिल्ह्यात 24 ऑगस्टपर्यंत एकूण 280.99 मि. मि. पर्जन्यमान झाले आहे.चालू सरासरीच्या तुलनेत 73.2 टक्के पर्जन्यमान झाले आहे.जूनमध्ये 33.6 मि. मि.,जुलैमध्ये 227.7 मि.मि.तर ऑगस्टमध्ये 19.6 मि.मि.पर्जन्यमान झाले आहे.जिल्ह्यात काहीं महसूल मंडळामध्ये पावसात 3 ते 4 आठवड्याचा खंड पडलेला आहे. त्यामुळे पिकावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.


उस्मानाबाद तालुका - जागजी,उस्मानाबाद शहर, उस्मानाबाद ग्रामीण,अंबेजवळगे, बेंबळी,करजखेडा,केशेगाव,ढोकी, येडशी,तेर.परंडा तालुका - आनाळा, शेळगाव,सोनारी,परंडा.कळंब तालुका - येरमाळा,मस्सा (खं).,शिराढोण व नायगाव,उमरगा तालुका -डाळींब, बलसूर,उमरगा,बेडगा व मुरुम. लोहारा  तालुका - जवेळी व धानुरी आणि तुळजापूर तालुका -तुळजापूर, सावरगाव,मंगरुळ,ईटकळ, तामलवाडी,आरळी (बु.) या महसूल मंडळामध्ये सर्वेक्षणाचे काम चालू आहे.


24 ऑगस्टपर्यंत ज्या महसूल मंडळामध्ये अद्याप 21 दिवसाचा पावसात खंड पडलेला नाही अशी महसुल मंडळे पुढीलप्रमाणे आहेत. उस्मानाबाद तालुका -पाडोळी. तुळजापूर तालुका -सलगरा, जळकोट,नळदुर्ग.उमरगा तालुका - मुळज व नारंगवाडी. लोहारा तालुका - लोहारा व माकणी.कळंब तालुका- कळंब, ईटकूर, मोहा व गोविंदपूर.भूम तालुका -अंभी,पाथ्रुड,माणकेश्वर, आष्टा,भूम,वालवड व ईट. वाशी तालुका -वाशी,पारगाव,पारा व तेरखेडा. परंडा तालुका -आसु, जवळा व पाचपिंपळा आदी महसूल मंडळात 21 दिवसाचा पावसात खंड पडलेला नाही.


 
Top