धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील ख्वाँजा नगर भागातील लिमरा हॉटेल ते पटेल मेडीकलपर्यंत मुख्य रस्त्यावर नालीचे सांडपाणी वाहून जात असल्यामुळे त्या पाण्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यात यावी अशी मागणी, या परिसरातील रहिवाशांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडे दि.24 ऑगस्ट रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, आम्ही ख्वाँजा नगर मेन रोड येथील रहिवासी असून नागरिक धाराशिव शहरातील सोलापुर रोड ख्वाँजा नगर भागातील लिमरा हॉटेल ते पटेल मेडीकलपर्यंत मुख्य रस्त्यावर नालीचे घाण सांडपाणी वाहून जात असल्यामुळे रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे काही अपघात झाले आहेत. तसेच भविष्यात अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर नालीचे पाणी साचून राहील्यामुळे त्याच्यावर डासांची पैदास होवून परिसरातील नागरिकांना आरोग्याचा त्रास होत आहे. त्यामुळे याची दखल घेवून त्वरीत नालीचे वाहून जाणाऱ्या सांड पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी किंवा व्यवस्थित विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे. यावर आरेफ सय्यद, फिरोज शेख, सुरज तांबोळी, सलीम मुलाणी, आजम शेख, अरबाज शेख, नियाज शेख, नितीन गायकवाड, मुन्ना तांबोळी, सोहेल शेख, लाला शेख, मनोजकुमार घेवारे, कुणाल जाधव, बिलाल मुल्ला, रमेश भोयटे, संजय जगदाळे, बालाजी भोसले, कलीम सय्यद, बशीर तांबोळी, साजिद पठाण आदींसह इतरांच्या सह्या आहेत.


 
Top