तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे चंद्रयान -3 चंद्रावर पाऊल ठेवताच येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय गंगणे मिञ मंडळा तर्फ 101 किलो पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा केला.
चंद्रयान -3 सायंकाळी 6.04 वा. चंद्रावर पाऊल ठेवताच फटाके फोडुन 101 किलो पेढे शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विजय गंगणे यांच्या वतीने वाटप करण्यात आले. यावेळी विजय गंगणे, विशाल रोचकरी, प्रकाश मगर, प्रदीप अमृतराव, मनोज गवळी, ओनिल हंगरगेकर, कुमार पांढरे, ओंकार लोंढे, सचिन वाघमार,े विवेक तांबे, दादा दळवी, भारत चौधरी, सुरज साठे, सचिन कदम, सचिन काळे, किवु कदम अदि उपस्थितीत होते.