धाराशिव (प्रतिनिधी)-अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाचे प्रवेश नुकतेच पूर्ण झाले असून पहिल्याच दिवशी पालक मेळाव्याचे आयोजन येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले होते. बेसिक सायन्स अँड हुमानिटी विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने , धेनु ॲपचे नितीन पिसाळ , सुरज खवले ,बेसिक सायन्सच्या विभागप्रमुख डॉ. उषा वडने,डॉ. डी.डी. दाते ,डॉ.पी.एस.कोल्हे, प्रा.एस.ए. गायकवाड ,प्रा.एस.एम. पवार ,प्रा.डी.एच. निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

उद्घाटन पर भाषणात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, पालक मेळावा ही एक काळाची गरज असून बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये करिअरची सुरुवात झालेली असते. पहिल्या दिवसापासून त्याचे योग्य नियोजन ,समन्वय केला तर अभियांत्रिकीचा विद्यार्थी निश्चितपणे करिअरमध्ये सर्वोत्तम संधी मिळवू शकतो. त्यामुळेच या मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. याप्रसंगी डॉ. माने यांनी  विद्यार्थ्यांना  अभ्यासक्रमासोबतच कौशल्यावर आधारित अनेक उपक्रम राबवीत असल्याचे नमूद केले.  

प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विभाग प्रमुख डॉ. उषा वडणे आपल्या प्रास्ताविक पर भाषणात म्हणाल्या की , यश संपादन करण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही. याप्रसंगी विविध विभागाचे विभाग प्रमुख यांनीही मार्गदर्शन केले.  याच महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी अभिजीत माने ,ऐश्वर्या सक्राते, प्रांजली जगताप, नयूम शेख, प्रज्ञा माचवे यांनी आपला महाविद्यालयातील अनुभव उपस्थितासमोर कथन करून महाविद्यालयाचे आभार मानले. पालक प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले जुल्फेकार काझी, सौ.शैला दसपुते व शेलार यांनीही महाविद्यालयाचे आभार मानले. यावेळी बोलताना पालक प्रतिनिधी जुल्फेकार काझी तसेच शैला दसपुते यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बेसिक सायन्स विभागातील प्रा. प्रमोद तांबारे ,प्रा.मनोज जोशी, प्रा.मुंडे, सतीश नेपते, वाघमोडे यांनी विशेष परिश्रम केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगिता अजमेरा यांनी केले तर आभार प्रा.बालाजी चव्हाण यांनी मानले.


 
Top