धाराशिव (प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीचे नूतन जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य यांचा राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मुंबई येथे जिल्हाध्यक्ष चालुक्य यांनी बुधवारी पालकमंत्री प्रा. डॉ.सावंत यांनी भेट घेतली. यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. अनिल काळे, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, प्रवीण पाठक, गुलचंद व्यवहारे उपस्थित होते.