धाराशिव (प्रतिनिधी)-महा जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांशी थेट संपर्क होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या सर्वसमावेशक कार्यकर्तृत्वावर नागरिक अतिशय समाधानी आहे.   त्यांच्या धोरणात्मक निर्णयामुळे जागतिक स्तरावर दहाव्या स्थानी असलेली भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली असून व्यापार्‍यांनी देखील चार्टर्ड अकाऊंटंट समूहांच्या माध्यमातून त्यांच्या अडी अडचणी व समस्यांचे निवेदन द्यावे, ते सोडविण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू असे प्रतिपादन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यापारी संमेलनाला संबोधित करताना केले. काल दिनांक एक जुलै रोजी मोदी 9 महा जनसंपर्क अभियानांतर्गत पुष्पक मंगल कार्यालय धाराशिव येथे जिल्ह्यातील व्यापार्‍यांसाठी आयोजित केलेल्या व्यापारी संमेलनामध्ये ते बोलत होते.

जिल्ह्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खंबीरपणे आपल्या पाठीशी असून येथील रोजगार निर्मिती व अर्थकारणाला चालना देण्यासाठी उद्योग व पर्यटन या क्षेत्रावर भर देणे गरजेचे आहे. 

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांचेही भाषण झाले. यावेळी लातूर येथील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट आनंद बारकूते, प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड मिलिंद पाटील, सुधीर पाटील, अँड. खंडेराव चौरे, संताजी चालुक्य, सतिष दंडनाईक, अस्मिताताई कांबळे, युवराज नळे, जेष्ठ नेते अशोकभाऊ शिंदे, जिल्हा संयोजक नेताजी पाटील, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनियार, विक्रमसिंह देशमुख, मजूर फेडरेशन चेअरमन नारायण नन्ननवरे, राहुल पाटील सास्तुरकर, रामदास कोळगे, हनुमंत पाटील, संतोष बोबडे, राजाभाऊ पाटील, अजित पिंगळे, राजकुमार पाटील, सचिन पाटील, अनंतराव देशमुख, राजसिंह राजेनिंबाळकर, निहाल काझी यांच्यासह जिल्हाभरातून आलेले व्यापारी बांधव, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top