तुळजापूर  (प्रतिनिधी)- तालुक्यात  महाराष्ट्रात  झालेल्या राजकिय   भुकंपाचे  झटके  कमी  दाबाने  बसण्याची  शक्यता  आहे. माञ या राजकिय भुकंपाचा प्रभाव महाविकास आघाडी वर फारसा पडणार नसल्याचे सध्या तरी वाटत आहे. नळदुर्गचे अशोक  जगदाळे हे मंञी दिलीप वळसे पाटील यांचे जवळचे मानले जातात ते काय करणार या बाबतीत उत्सुकता लागली आहे. त्यामुळे सर्व सामान्य लोकांच्या मतानुसार राजकारणात आत काहीच राम राहिला नाही अशी बोलकी प्रतिक्रिया येत आहे.

गटात जाण्याची शक्यता सध्या तरी दिसुन येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एक-दोन कार्यकत्यांनी दादा सोबत जाण्याची प्रतिक्रिया सध्या व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका युवा पदाधिकारीने ऐंशी टक्के राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी शरद पवार साहेबांसोबत राहतील अशी प्रतिक्रिया दिल्या. या राजकिय भुकंपाबाबतीत मिश्कील तर काहीसी लोकशाही बाबतीत चिंता व्यक्त करणार्‍या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. यातील सर्वात बोलकी आता राजकारणात राम राहिला नाही.


 
Top