तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळ तर्फ श्रीतुळजाभवानी माते चरणी नगारा (चर्मवाद्य )अर्पण सोहळा पारंपरिक पध्दतीने मिरवणुकिने मंदीरात आणुन बुधवार दि. 19 रोजी संपन्न झाला.
येथील मातंग नगर मध्ये तयार करण्यात आलेल्या ठिकाणी नगाराचे पुजन प्रथम ज्या परिवाराने तयार केला त्याच्या हस्ते करण्यात आल्यानंतर महंत तुकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, प्रशासकिय व्यवस्थापक तथा तहसिलदार संतोष पाटील, धार्मिक सिध्देश्वर शिंदे, वित्त व लेखाधिकारी तथा धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले यांच्या हस्ते पुजन करुन आरती करण्यात आली. यावेळी विश्वास परमेश्वर, विशाल रोचकरीसह मंदिर कर्मचारी, प्रक्षाळ मंडळ सदस्य उपस्थिती होते.
मातंग नगर येथुन नगारा शोभायाञेस आरंभ झाला. शुक्रवार पेठ, पावणारा गणपती, आर्य चौक, कमानवेस, क्रांती चौक, भवानीरोड मार्ग ही शोभायाञा मंदिरात आली. नंतर निंबाळकर दरवाज्याचा उजव्या बाजुस हा नगारा विराजमान करण्यात आला. नगारा नवीन चर्मवाद्य हे गुरुवार पासुन देवीचरणी सेवेत दाखल होणार आहे.
