तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानी मातेचे ऐतिहासिक पुरातण प्राचीन मौल्यवान सुवर्ण अलंकार तसेच भाविकांनी वाहिलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंची 1963 नंतर प्रथमच मोजदाद पुर्ण करुन याचा अहवाल समितीने मंगळवार दि. 18 जुलै रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना सादर केला. परंतु जिल्हाधिकार्यांनी सदर अपुरा असून, त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करावा व नंतर अहवाल सादर करावे असे सांगितले.
या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी या मोजदाद मधुन स्पष्टता यावी पारदर्शकता दिसावी यासाठी तीन विभागात स्वतंञ सुधारीत अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे समजते. सदरील सुधारीत अहवाल दोन दिवसात जिल्हाधिकारी यांना सादर केला जाणार असल्याचे कळते,
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या पुरातन सुवर्ण अलंकार मोजदाद 1963 ला झाल्याचे समजते. त्यानंतर आता 2023 ला ही मोजदाद करण्यात आली. एक महिनाभर ऐतिहासिक प्राचीन नवे, जुने सुवर्ण अलंकार मोजदाद झाली. नंतर एक महिना अहवाल तयार करण्यासाठी समितीला लागले. या मोजदादमध्ये प्राचीन पुरातन असे एक ते सात नंबर डब्यातील अलंकार मोजदाद झाली. यात काहीत कमी आले तर काहीत अधिक वस्तु मिळाल्याचे कळते.
ज्या कार्यकाळात वस्तू गहाळ झाल्या त्या काळातील संबधितांवर जबाबदारी निश्चीत करुन त्यांच्या बाबतीत काय करायाचे याचा निर्णय समितीने घ्यावा अशी सुचना समितीने सुचवल्याचे समजते.
या अहवालामुळे मंदिरात ऐतिहासिक पुरातन प्राचीन किती आहेत व नवीन किती आले हे स्पष्ट होणार आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर कारभार बाबतीत पारदर्शकता स्पष्टता यावी यासाठी सीऐ कायम स्वरुपी धार्मिक व्यवस्थापक सोने समजणारा सोनार याची नेमणुक करुन प्रत्येक वर्षी आँडीट करण्याचा सुचना समितीने जिल्हाधिकार्यांकडे केल्या असुन यास जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते.
